मागील दोन दिवसांमध्ये झालेल्या पावसाने बीडच्या आष्टी तालुक्यातील मातकुळी गावात संत्रा फळबागेचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकरी बापू जरे यांच्या साडेचार एकर क्षेत्रावरील संत्रा फळबागेचं देखील यात मोठं नुकसान झालं असून सर्व फळं गळून पडली आहेत.
बागेचं हे नुकसान पाहून शेतकऱ्याचा अश्रूंचा बांध फुटला.